प्रताप इंग्लिश मिडीयम स्कूल चोपडा या ठिकाणी जैवविविधता निसर्गसंवर्धन कार्यशाळा संपन्न.
Correspondent: Mr. Samadhan Mali
Date: 09 - October - 2024
Chopda, Jalgaon, Maharashtra
“ जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता, जातींमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता.
आपल्याला जैवविविधता जर राखायची असेल तर, ज्या दुर्मीळ जातींचे सजीव आहेत त्या सजीवांचे संरक्षण केले पाहीजे. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे खूप जरुरी आहे. ज्या क्षेत्रात जास्त प्रमाणात सजीव आहेत ते क्षेत्र 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे. ज्या जाती दुर्मीळ होत आहेत त्या प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. याच अनुषंगाने चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी वैजापूर परिक्षेत्रातील उपवनरक्षक व वाइल्डग्राफ फोटोग्राफर श्री विजय शिरसाट सर यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन करत असताना अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट करून विद्यार्थ्यांना त्यासंदर्भातली आवड या ठिकाणी निर्माण करून दिली वन्यजीव पर्यटन हा जो त्यांच्या
नैसर्गिक अधिवासातील स्थानिक प्राणी आणि वनस्पती जीवन यांचे निरीक्षण आणि परस्परसंवादावर केंद्रित आहे. त्यामध्ये त्यांनी विविध प्राण्यांचा संदर्भात, विविध पक्षी संदर्भात, नैसर्गिक वनस्पती,निसर्गातील पक्षी, फुलपाखरे, झाडे, पाने, फळ, फुले माणसांशी कशाप्रकारे संवाद साधतात.त्यांचं जीवनचक्र, विविध प्राण्यांचे ठसे,अन्नसाखळी तसेच वर्ल्ड ग्राफ फोटोग्राफीसाठी लागणारे इक्विपमेंट या सर्व बाबींवर सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थी या ठिकाणी घेतली... त्याप्रसंगी प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री रजीश बालन सर उपमुख्याध्यापक निखिला मॅम उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती टीचर तसेच कार्यशाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा स्वागत अक्षरा पालीवाल व आभार प्रदर्शन दिव्येश पाटील आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.
Comentarios