ओणम उत्सव प्रताप इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे मोठ्या उत्साहात साजरा
Updated: Sep 28, 2024
Correspondent: Mr. Samadhan Mali
Date: 19 - September - 2024
Chopda, Jalgaon, Maharashtra
ओणम हा वार्षिक सण आहे, जो सहसा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान येतो आणि दहा दिवस साजरा केला जातो . भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात ओणम हा राज्य सण मानला जातो. हे नवीन वर्षाच्या दिवसाचे स्मरण करते आणि कापणी उत्सव म्हणून देखील ओळखले जाते. भगवान विष्णूने राजा महाबलीला वर्षातून एकदा त्याच्या राज्याला (केरळ) भेट देण्यास सक्षम असा आशीर्वाद दिला. म्हणूनच केरळमधील लोक हा ओणम सण त्यांच्या लाडक्या राजा महाबली याच्या घरी येणारा दिवस म्हणून साजरा करतात. त्याचा औचित्य साधत चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या संचलित प्रताप इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा या ठिकाणी ओणम उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवंदना गायन करून त्यांचे स्वागत केलं, राजामहाबली शैक्षणिक संकुलात प्रवेश करताना घोषणा देत स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, नंतर ओणम संस्कृती नुसार विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नृत्य त्या ठिकाणी सादर केलं त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी विविध रंगाची वेशभूषा परिधान ओणम संस्कृती दर्शन घडविले बरोबर विद्यार्थ्यांनी रस्सीखेच या खेळामध्ये मध्ये सहभाग नोंदविला या संस्कृतीचे दर्शन याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं त्याप्रसंगी प्रताप विद्या इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक मा श्री रजीश बलन सर, चोपडा एज्युकेशन सोसायटीचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी उपमुख्याध्यापक निखिला मॅडम,सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
Comments